LATEST NEWS

कु.श्रावणी भाऊसाहेब बनबरे हिचे उत्तुंग यश; ९५.६०% गुणांसह बिलोली तालुक्यात दुसरी!*

By AMARDEEP ASHOKARAO DAGDE DAGDE • 2026-05-10 11:05 • 131 views   Share WhatsApp Share Facebook Share X
कु.श्रावणी भाऊसाहेब बनबरे हिचे उत्तुंग यश; ९५.६०% गुणांसह बिलोली तालुक्यात दुसरी!*
अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी) ​बिलोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) निकाल २०२६ मध्ये बिलोली येथील आंतरभारती विद्यालयाने देदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी *कु. श्रावणी भाऊसाहेब बनबरे* हिने *९५.६०% गुण* मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. विशेष म्हणजे, तिने *संपूर्ण बिलोली तालुक्यातून संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक संपादन* करून सर्वत्र नाव लौकिक केला आहे. ​ श्रावणीने मिळविलेल्या या ऐतिहासिक यशामुळे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिच्या या यशाबद्दल आंतरभारती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई पटणे, सचिव चंद्रशेखर पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा सहसचिव जयमाला पटणे यांनी तिचे विशेष कौतुक केले. ​तसेच पूज्य साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, यांनीही श्रावणीच्या कष्टाचे चीज झाल्याचे सांगत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ​ श्रावणीच्या या यशात तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे व तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. श्रावणीने आपले हे यश टिकवून ठेवावे आणि भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करावी, यासाठी तिला पत्रकार शंकर पवार व अशोक दगडे, व्यंकटेश्वर बनबरे,भाऊसाहेब बनबरे, सुधाकर बनबरे, तुकाराम शिंदे, सुभाष पवार, श्याम पवार, नागनाथ चव्हाण, राजेंद्र रेड्डी, माधव भंडारे, रुद्रुरकर परिवार यांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत.